आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील महामार्ग लगत वाढत चाललेले अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतूक, यामुळे अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांच्या मार्गात अडथळे येत आहेत. नगरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच आहे. पण बेशिस्त वाहनचालकांमुळे काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी रुग्णवाहिकांना अर्धा ते पाऊण तास विलंब होत आहे.
अहमदनगर शहर हे गेल्या काही वर्षांपासून हॉस्पिटल हब म्हणून ओळखले जात आहे. छोट्या मोठ्या आजारांपासून ते गंभीर आजाराम पर्यंत तातडीने उपचार करणारे अद्ययावत दवाखाने नगर शहरात सुरू झालेले आहेत यापैकी बहुतांश रुग्णालय महामार्गालगत आहेत. या रुग्णालयापर्यंत जाण्याचे मार्ग मात्र अरुंद झाल्याचे चित्र दिसत आहे.
नगर पुणे महामार्ग, नगर मनमाड महामार्ग, तसेच काही शहरांतर्गत गल्लीबळांमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. शहरातील वाहतूक कोंडीतून या रुग्णालयापर्यंत जाताना रुग्णवाहिकांची मात्र दमछाक होताना दिसत आहे. नगर मनमाड महामार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढलेले आहे त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. अत्यवस्थ रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला प्राधान्याने वाट मोकळी करून देणेऐवजी रुग्णवाहिकेच्या पुढे जाण्याची अहमहमिका लागल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. यामुळेही होते वाहतूक कोंडी काही रुग्णालया शेजारी खाद्यपदार्थांची विक्री करणारे विक्रेते, व्यवसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. रस्त्यावर गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. नगर शहरात दिवसातून दोन-तीनदा तरी वाहतूक कोंडीमध्ये सायरन वाजवणारी रुग्णवाहिका अडकल्याचे चित्र दिसते.
महामार्गांवरच वाहनांची पार्किंग नगर ते मनमाड महामार्गावर अनेक ठिकाणी कार सजावटीची दुकाने आहेत. या दुकानांसमोर बेशिस्तपणे वाहने पार्किंग केलेली असतात त्यामुळे ही वाहतूक कोंडीत भर पडत आहे. काही दुकाने रुग्णालयाशेजारीच आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांचा रस्ता अडवला जातो. अडथळा निर्माण कराल तर... सन १९८८ च्या मोटार वाहन कायद्यातील कलम १९४ ई नुसार अत्यवस्थ रुग्णाला घेऊन जाणारा रुग्णवाहिकेला प्राधान्याने रस्ता देणे क्रमप्राप्त आहे. रुग्णवाहिकेच्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्याला १० हजार रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांच्या मार्गात अडथळे आणू नयेत. अॅड. मंगेश दिवाणे, सहायक सरकारी वकील, नगर.
अडथळा निर्माण कराल तर... सन १९८८ च्या मोटार वाहन कायद्यातील कलम १९४ ई नुसार अत्यवस्थ रुग्णाला घेऊन जाणारा रुग्णवाहिकेला प्राधान्याने रस्ता देणे क्रमप्राप्त आहे. रुग्णवाहिकेच्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्याला १० हजार रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांच्या मार्गात अडथळे आणू नयेत. अॅड. मंगेश दिवाणे, सहायक सरकारी वकील, नगर.
महामार्गांवरच वाहनांची पार्किंग नगर ते मनमाड महामार्गावर अनेक ठिकाणी कार सजावटीची दुकाने आहेत. या दुकानांसमोर बेशिस्तपणे वाहने पार्किंग केलेली असतात त्यामुळे ही वाहतूक कोंडीत भर पडत आहे. काही दुकाने रुग्णालयाशेजारीच आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांचा रस्ता अडवला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.