आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णसेवेचा वसा:अद्ययावत, तत्पर व सक्षम सेवेमुळे पाटील अ‍ॅ​​​​​​​क्सिडेंट हॉस्पिटलचे जिल्ह्यात नाव : पवार

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अद्ययावत व सक्षम सेवेमुळे पाटील अॅक्सिडेंट हॉस्पिटल चे नाव जिल्ह्यात सर्वपरिचित झाले आहे रुग्णसेवेचा वसा असाच या पुढे चालू ठेवावा, असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

पाटील हॉस्पिटलमध्ये डॉ. मोहरकर आयसीयू अँड क्रिटीकल केअर च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, आमदार नीलेश लंके, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, उपमहापौर गणेश भोसले, सागर धस, आष्टी नगर पंचायतीचे अध्यक्ष बालू धोंडे, सरपंच अमोल जगदाळे, कड्याचे सरपंच युवराज पाटील, बीडसांगवीचे सरपंच बबनराव करांडे, उपस्थित होते. पाटील एक्सिडेंट हॉस्पिटल मध्ये अपघातग्रस्तवरील उपचारांबरोबरच मणक्याच्या व्याधी, अर्थोस्कॉपी, कृत्रिम सांधेरोपण, याचबरोबर डॉक्टर मोहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह, हृदयविकार, श्वसनाचे आजार, पचनसंस्थेचे आजार, मेंदू, सर्पदंश, विषबाधा यांच्यावर देखील उपचार करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्येच सुसज्ज आय.सी. यू. बरोबरच पॅथॉलॉजी लॅबचे उद्घाटन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...