आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंद:शेतात पाणी साचल्याने राहाता तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान

राहाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणरायांच्या आगमनानंतर रात्री राहता तालुक्यात जोरदार झालेल्या पावसाने तालुक्यातील अनेक ठिकाणी ओढे नाले तुडुंब भरून शेतात पाणीच पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उष्णतेने होरपळलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. मात्र जास्त पाणी साचल्याने काही पिकांना नुकसानाची झळ बसल्याने या पावसामुळे कहीखुशी कही गम असे चित्र आहे.

सुमारे महिनाभराच्या विश्रांतीनंतर वरूणराजाने गणरायांच्या आगमनाचा मुहूर्त धरून रात्री दहापासून दोन ते अडीच तास जोरदार बरसला. सर्वत्र पाणीच पाणी करीत अनेक शेतात व शहरातील भागात तळ्याचे स्वरूप बनवले. राहाता नगरपालिकेचे नगर मनमाड रस्त्यावरील छत्रपती कॉम्प्लेक्सच्या तसेच बाजार तळावरील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलातील तळ मजल्यातील दुकानात पाणी शिरल्याने व्यवसायिकांना मोठे नुकसान व मनस्तापही स्वीकारावा लागला. तालुक्यात अनेक ठिकाणी चार ते साडेचार इंच पावसाची नोंद झाली. तालुक्यातील राहाता व शिर्डी सह ग्रामीण भागात अनेक शेतात पाणी साचले होते. फुलोऱ्यावर आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा नुकसानीचा फटका बसेल, अशी भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली तर सुकून चाललेल्या सोयाबीन पिकाला या पावसाचा फायदा होईल.

बातम्या आणखी आहेत...