आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा:कोरोना काळात 108 रुग्णवाहिका ठरली 27 हजार रुग्णांना आधार, जिल्ह्यात 40 रुग्णवाहिका संकटकाळात होत्या तत्पर

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या संकटकाळात कोरोनायोद्धा म्हणून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस यांनी परिश्रम घेत सेवा पुरवली. या सर्वांबरोबर जीवनवाहिनी ठरलेली १०८ रुग्णवाहिकेने २७ हजार ७११ कोरोना रुग्णांना सेवा दिली. कोरोनाच्या संशयितांची तपासणी करण्यासाठी व संशयितांसह कोरोनाग्रस्तांचे विलगीकरण करण्यात येणाऱ्या सर्वांची ने-आण करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकांची सेवा उपयुक्त ठरली. जगभर कोरोनाने थैमान घातले होते. या संकटकाळात १०८ रुग्णवाहिका कोरोना रुग्णांना सेवा पुरवली. त्यासाठी अ‍ॅडव्हान्स लाइफ सर्पोटच्या ९ आणि बेसिक लाइफ सर्पोटच्या ३१ अशा ४० रुग्णवाहिका या संकटकाळात तत्पर होत्या. संकटकाळात केवळ आपत्कालीन सुविधेसाठीच नव्हे, तर कोरोनासह नॉनकोविड रुग्णांनाही या रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळाला. २०२० मध्ये १९ हजार ७१४, २०२१ मध्ये ७ हजार ८४५ तर २०२२ मध्ये फेब्रुवारीपर्यंत १५२ अशा २७, ७११ कोरोना रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.

आपत्कालीनच नव्हे, तर नॉनकोविड रुग्णांनाही दिली सेवा

कोरोनाकाळात रुग्णांना वेळेत रुग्णालयांत नेले
कोरोनाकाळात रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचे काम १०८ रुग्णवाहिकने केले. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात १०८ रुग्णवाहिकेचा मोलाचा वाटा राहिला. सेवा अशीच अखंडित सुरू राहील. गेल्या आठ वर्षांत दोन लाख रुग्णांना सेवा दिली आहे. '' डॉ. सुवर्णमाला गोखले, कांचन बिडवे, जिल्हा समन्वयक, १०८ रुग्णवाहिका, नगर.

दोन लाखांवर रुग्णांना सेवेचा फायदा
जिल्ह्यात २०१४ ही रुग्णवाहिका सेवा सुरू आहे. कोरोना रुग्णांसोबत अपघात, जळणे, हृदयरोग, उंचावरून पडणे, विषबाधा, प्रसूती, वीज चमकणे किंवा विद्युत धक्का, वैद्यकीय, आत्महत्या अशा घटनांमधील सुमारे २ लाख ४६ हजार ३१ रुग्णांना ही सेवा देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...