आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्वाला श्रध्दा-सबुरी बरोबरच सर्व धर्म समभाव हा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत दीपावलीच्या सुटीदरम्यान लाखो भाविकांनी हजेरी लावत साईचरणी लीन होत केवळ १५ दिवसांत तब्बल १८ कोटी रुपयांचे दान साईबाबांच्या झोळीत जमा केले आहे. या दानात २९ देशांतील २४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या परकीय चलनासह ३९ लाख ५३ हजार रुपयांचे सुमारे ८६०.४५० ग्रॅम सोने आणि ५ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या १३३४५ ग्रॅम चांदीचाही समावेश आहे
शिर्डीत दरवर्षी सुमारे तीन कोटीहून अधिक देश-विदेशातून भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात. यात राजकीय नेते, सेलिब्रिटी, क्रिकेटर, उद्योजकांचाही समावेश असतो. यंदा दीपावलीच्या सुट्टीनिमित्ताने २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात शिर्डी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. या काळात साई संस्थान प्रशासनाने भाविकांसाठी सुखसुविधा उपलब्ध करून सुकर दर्शनाची व्यवस्था केली हाेती. साई संस्थानाला भाविकांकडून आलेल्या दानातून भाविकांसाठी साई प्रसादालय, अत्याधुनिक साईभक्त निवास, साइ सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि साईनाथ रुग्णालय, शैक्षणिक संस्था आदीसह शिर्डीत पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो. राज्यातील गोरगरीब आणी गरजू रुग्णांसाठी साईनाथ रुग्णालयात मोफत अद्ययावत उपचार केले जातात. साईबाबा सुपर स्पेशालिटीत अल्पदरात उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .
संस्थानाला मिळालेल्या दानाचा तपशील असा... दक्षिणा पेटी : ३ कोटी ११ लाख ७९ हज़ार १८४ रुपये देणगी काउंटर : ७ कोटी ५४ लाख ४५ हज़ार ४०८ रुपये ऑनलाइन देणगी : १ कोटी ४५ लाख ४२ हज़ार ८०८ रुपये चेक / डीडी देणगी : ३ कोटी ३ लाख ५५ हजार ९४६ रुपये मनीआर्डरद्वारे : ७ लाख २८ हजार ८३३ रुपये डेबिट क्रेडिट कार्ड देणगी : १ कोटी ८४ लाख २२ हजार ४२६ रुपये सोने : ८६०.४५० ग्रॅम सोने (३९.५३ लाख २९ रुपये) चांदी : १३३४५. ९७० ग्रॅम (५. ४५ लाख) परकीय चलन : २४.८० लाख (२९ देशांचे) भाविकांकडून आलेल्या दानाची मोजदाद करताना साई संस्थानचे कर्मचारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.