आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:परिवर्तन मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट सोसायटीच्या संचालकांनी ठेवीदार व गुंतवणुकदारांना ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून सोसायटीचे बचत खाते, आरडी, मुदतठेव खात्यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत गुंतवणुकीची रक्कम मुदतीनंतर न देता अफरातफर करुन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत जाधव हे तपास करत आहेत. सोसायटीच्या जामखेड शाखेमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदार, ठेवीदारांनी कागदपत्रासह तपासकामी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...