आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ईडी चौकशी मुंबईत, अनिल परब साई दर्शनाला शिर्डीत, परब यांच्या वकिलांकडून लेखी जबाब सादर

शिर्डी, मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बुधवारी समन्स बजावले होते. मात्र, चौकशीला हजर राहण्याऐवजी ते शिर्डी दौऱ्यावर आले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार साईबाबांच्या दर्शनासाठी आलेलो असून मुंबईला गेल्यावर ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती परब यांनी पत्रकारांना दिली.

दापोलीतील कथित बेकायदा रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना बुधवारी सकाळी १० वाजता मुंबई येथील ईडीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. जबाब नोंदवण्यासाठी परब यांना पाचारण केले होेते असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु परब यांच्यावतीने त्यांच्या वकीलांनी ईडी कार्यालयात लेखी जबाब सादर केला. त्यामुळे ते हजर राहिले नाहीत.

सोमय्यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही : अनिल परब
आपल्याला ईडी जे विचारेल त्या प्रश्नांची उत्तरे देऊ. मात्र, किरीट सोमय्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास मी बांधील नाही, अशा शब्दांत परब यांनी किरीट सोमय्यांना फटकारले.

बातम्या आणखी आहेत...