आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांनी नोंदणी करावी : घुले

नेवासे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि मजूर सहकारी संस्था यांना जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात येणारी कामे करायची आहेत, त्यांच्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी जास्ती जास्त सुक्षिशित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांनी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय घुले यांनी केले आहे.

जिल्हा परिषद मार्फत विविध विकास कामाचे वाटप करण्यात येते. सदरचे वाटपामध्ये सुसत्राता व पारदर्शकता येणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांनी सुक्षिशित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांना विविध विकास कामाचे कामवाटप करण्यासाठी जिल्हा परिषद वेबसाईटवर (https:// nagarzpkamwatap.in/ oldUserRegistration ) नोंदणी करणेबाबत सूचित केले आहे. तरी सुक्षिशित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांनी जास्ती जास्त नोंदणी करावी तसेच सदर बाबत काही अडचणी असल्यास पंचायत समिती सार्वजनिक बांधकमा विभाग नेवासे येथे संबंधित फार्म उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने अभियंता व मजूर सहकारी संस्था यांनी नोदणी करावी.

बातम्या आणखी आहेत...