आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटोदा वडील एका पायाने अपंग तर आईला अक्षरओळख नाही. घरची परिस्थिती बेताची. पण अशा स्थितीतही मुलाला घडवायचे स्वप्न उराशीबाळगत दांपत्याने कधीऊसतोडणी तर कधीमजुरीच्या पैशातून मुलाच्याशिक्षणाचा खर्च भागवला.आई-वडिलांच्या कष्टाचेचीज करत पाटोदातालुक्यातील सावरगाव घाट येथील संतोष आजिनाथ खाडेने कुठलेही क्लास न लावता घरीच अभ्यास करून आणि मोबाइलपासून तीन वर्षे दूर राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात १६ वी रँक मिळवली. एनटीडी प्रवर्गातून तो राज्यातून प्रथम आला.
सावरगाव घाट गावाजवळील खाडे वस्तीवर वडील आजिनाथ खाडे, आई सरूबाई, दोन मुली आणि संतोष असे पाच जणांचे कुटुंब राहते. त्यांना साडेचार एकर कोरडवाहू जमीन आहे. संतोषचे प्राथमिक शिक्षण खाडे वस्तीवरील जि. प. शाळेत झाले. पुढे टाकळीच्या आश्रमशाळेत शिक्षण घेतल्यांनतर पाटोदा येथील भामेश्वर विद्यालयात त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले. अकरावी-बारावीचे शिक्षण तालुक्यातील मुगगाव येथे तर पदवीचे शिक्षण बीडच्या बलभीम महाविद्यालयात पूर्ण केले. नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.