आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:पुण्यस्मरणदिनी स्वीकारले विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय शिक्षिका स्व. लिलाबाई बाबुराव दळवी-क्षीरसागर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची जाणीव ठेऊन त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांनी सेवा केलेल्या वांबोरी (ता. राहुरी) येथील गरजू घटकातील विद्यार्थिनीचे दहावीसाठी एक वर्षाचे संपूर्ण पालकत्व त्यांच्या परिवाराने स्वीकारले. स्व. दळवी हयात असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण व न्यू इंग्लिश स्कूल मलठण (ता. कर्जत) येथील इयत्ता आठवी ते दहावीतील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे, तसेच महेश मुनोत विद्यालयातील इयत्ता दहावीमध्ये हिंदी व इंग्रजी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस देण्याचे कार्य करत होत्या.

हे कार्य आजही सुरू आहे. त्यांच्या निधनानंतर गुणवंतांच्या बक्षिसाबरोबर गरजू मुलीचे इयत्ता दहावीसाठीचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्यासाठी दळवी परिवाराने पुढाकार घेतला आहे. पुण्यस्मरण दिनानिमित झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे पालकत्व स्वीकारले. यावेळी नाना शिंगोटे महाराज म्हणाले, स्व. लिलाबाई यांनी ३८ वर्षे विद्या दानाचे कार्य केले. त्यांनी शाळेत कार्यरत असताना नेहमीच गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य केले. हाच वारसा त्यांचे कुटुंबीय त्यांच्या स्मरणार्थ पुढे चालविण्याचा संकल्प केला आहे. स्वागत बाबूराव दळवी यांनी केले.

कार्यक्रमास माजी सभापती अ‍ॅड. सुभाष पाटील, विशाल दळवी, माजी विक्रीकर अधिकारी अशोक शेजूळ, स्वाती दळवी, शितल थोरात, शलाका राऊत, विनिता शेजूळ, महादेव दळवी, अलका दळवी, वसंत दळवी, स्मिता दळवी, माजी सरपंच एकनाथ ढवळे, रोहिणी कुसमुडे आदींसह क्षीरसागर, दळवी परिवार, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. लिलाबाई यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

बातम्या आणखी आहेत...