आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील बहुचर्चित डिपाॅल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील उपमुख्याध्यापक फादर जेम्स याच्याविरोधात धर्माचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. डोक्यावरील पगडी काढून, केस कापून आमचा धर्मांतर करण्यासाठी विद्यार्थ्याला दमदाटी करणाऱ्या उपप्राचार्य फादर जेम्सवर धर्माचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन या फादरला अटक करण्यात आली.
राहुरी फॅक्टरी येथे डिपाॅल शाळेत ही घटना घडली. एक शीखधर्मीय १४ वर्षीय मुलगा नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी फादर जेम्स हा शाळेत उपमुख्याध्यापक पदावर आहे. तक्रारीनुसार, ३० नोव्हेंबरला सकाळी साडेअकरा वाजता शाळेच्या मैदानावर हा विद्यार्थी उभा असताना फादर मुलाजवळ येऊन डोक्यावर घातलेली पगडी काढून टाक, तसेच केस कापून शाळेतील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे राहा व आमचा धर्म स्वीकार, या भाषेत विद्यार्थ्याला दमदाटी करून मारहाण करण्यासाठी मुलाच्या अंगावर धावून गेला. स्वत:चा बचाव करण्यासाठी हा विद्यार्थी घटनास्थळावरून निघून गेला. मुलाने ही घटना नातेवाइकांना सांगितली. त्यामुळे गुरुवारी त्यांनी मुलाला बरोबर घेऊन राहुरी पोलिस स्टेशन गाठले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.