आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीची मागणी:नागरीकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न ; नजीर शेख

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्रभाग क्रमांक ११ मधील बाबा बंगाली परिसरात आरसीसी गटार कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नगरसेवक नजीर शेख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरिफ गौरी, समशेर खान, इस्माईल बेग, नदीम शेख, सरवर कुरेशी, सलीम शेख, मुना शेख, सलीम खान, हबीब शेख, जगन्नाथ बनसोडे, नंदू बनसोडे आदी उपस्थित होते.

नजीर शेख म्हणाले की, गेली ४५ ते ५० वर्षे नगरसेवक पदाच्या माध्यमातून प्रभागातील मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावत आहे. रस्ते, गटारी, पथदिव्यांची कामे केली आहेत. बाबा बंगाली परिसरात गटारीचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांना यामुळे त्रास होत होता. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावला आहे. शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे वेळोवेळी निधीची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...