आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना:स्वाइन मुळे दोन महिन्यांत आठ मृत्यू, उपाययोजना कागदावर

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रूग्ण जुलैनंतर अचानक वाढले आहेत. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. स्वाइन फ्लू नियंत्रणात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत असून, दोन महिन्यांत ८ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाकडे १ जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे २८ रूग्णांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याची नोंद आहे. बहुतांश रूग्ण संगमनेर तालुक्यातील आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत ५३ हजार ९५९ रूग्णांची तपासणी केली आहे. ज्या ठिकाणी रूग्ण पॉझिटिव्ह आले, त्या भागात रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.

परंतु, प्रतिबंधात्मक उपायांच्या पानभर यादीत, सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये, लक्षणे असल्यास गर्दीत जाऊ नये आदी सूचना आहेत. पण रस्त्यावर थुंकला म्हणून किती जणांना दंड झाला ? याबाबत प्रशासनही निरूत्तर आहे. दरम्यान, स्वाईन फ्लूसाठी आवश्यक टॅमी फ्लूच्या टॅबलेट मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बहुतांश रूग्ण तसेच संपर्कातील लक्षणे दिसून येणाऱ्या रूग्णांना ७५ मि.ग्रॅ. टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या दिल्या जात आहेत.

२०१९ मध्ये झाले होते १५ मृत्यू
जिल्ह्यात २०१९ मध्ये १ लाख ३३ हजार ६२८ रूग्णांची तपासणी केल्यानंतर ५३ रूग्ण पॉझिटिव्ह व १५ मृत्यू झाले होते. २०२० व २०२१ मध्ये कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर स्वाइन फ्लू ने एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती आहे. परंतू, कोविडचा प्रादूर्भाव कमी होताच पुन्हा एकदा स्वाईन फ्लू ने डोके वर काढले आहे.

१० ऑगस्टला पहिला मृत्यू
दोन वर्षानंतर पहिला मृत्यू १० ऑगस्ट २०२२ रोजी झाला होता. त्यानंतर १५ ऑगस्ट, २३ ऑगस्ट, २४ ऑगस्ट, १९ ऑगस्ट, २४ ऑगस्ट, २५ ऑगस्ट व २८ ऑगस्ट व शेवटचा मृत्यू ५ सप्टेंबरला झाला. त्यानंतर एकही मृत्यु नाही. मागील पंधरा दिवसांत मृत्यू झाला नसला, तरी स्वाईन फ्लू हद्दपार झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...