आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यात ५ हजार ६३० पुरुष व २ हजार ४४० स्त्री व इतर दोन, असे एकूण ८ हजार ९२ मतदारांनी मतदार नोंदणी केली आहे. श्रीरामपूर मंडळात ३ हजार २१० पुरुष व १ हजार ६३९ व इतर दोन असे एकूण ४ हजार ८५१,बेलापूर मंडळात १ हजार १३९ पुरुष तर ३९६ स्त्री असे एकूण १ हजार ५३५ मतदार ,उंदिरगाव मंडळात ४७१ पुरुष व १८१ स्त्री असे एकूण ६५२ मतदार, टाकळीभान मंडळात ८१० पुरुष व २२४ स्त्री असे एकूण १०५४ मतदार नोंदणी झालेली आहे.
श्रीरामपुरात नवीन मराठी शाळा व कजे सोमय्या हायस्कुल मध्ये दोन मतदान केंद्र अाहे. श्रीरामपूर,भैरवनाथनगर, खंडाळा, दत्तनगर, उक्कलगाव, फत्याबाद, गळनिंब, कुरणपूर आदींसह इतर काही गावे तर बेलापूर येथील जेटीएस हायस्कूल मध्ये दोन केंद्र आहे. बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द, ऐनतपूर, उंबरगाव, वळदगाव,पढेगाव,कान्हेगाव,मालुंजा, लाडगाव,भेर्डापूर, तर उंदिरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत उंदिरगाव, हरेगाव, सराला, माळेवाडी, गोवर्धनपूर, नाऊर, जाफराबाद, नायगाव, मातुलठाण, गोंडेगाव, निमगाव खैरी, दिघी आदी गावांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.