आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरग्रस्त:आठ वर्षाच्या अहिल्या तांबे हिचे कॅन्सरग्रस्तांसाठी केस दान

संगमनेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅन्सरचे उपचार घेत असलेल्या व्यक्तींमध्ये किमोथेरेपी दरम्यान केस गळणे, अलोपेसियाचा त्रास होणे ही बाब रुग्णांचे मानसिक खच्चीकरण करणारी असते. या रुग्णांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु असतात. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. मैथिली व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सत्यजीत तांबे यांची ८ वर्षांची कन्या अहिल्या हिने स्वयंस्फूर्तीने रुग्णांच्या केसरोपणासाठी आपले केस दान केले आहे.

कॅन्सरवर वेळीच उपचार केल्यास तो नियंत्रणात येतो. रुग्णांवर केस रोपण करून त्यांना पूर्वस्थितीतील जीवन अनुभवता येते. रुग्णांची मानसिक स्थिती चांगली राहिल्यास ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात. अशा रुग्णांचे काही व्हिडीओ दुसरीत शिकणाऱ्या चिमुकल्या अहिल्याने पाहिले. बऱ्याच दिवसांपासून ती चिंताक्रांत होती. या रुग्णांना आपणाकडून काय मदत होईल, या विचारात ती होती. अहिल्याने ग्रेटा थनबर्ग आणि मलाला युसूफझाई यांची कहाणी आजी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्याकडून ऐकली. ग्रेटाने पर्यावरण रक्षणासाठी लढा दिला. मलालाने वयाच्या ११ व्या वर्षी तालिबान्यांसमोर न झुकता शिक्षणाचा निर्धार केला. त्यातून प्रेरणा घेत अहिल्याने केस दान करण्याचा निर्णय घेतला.

आहिल्याचा मला अभिमान वाटतो, तीने स्वतःहून कर्करोगाच्या रुग्णांसाठी निस्वार्थपणे केस दान केले. आजाराशी लढणाऱ्या रुग्णाबद्दल आत्मीयता व्यक्त केली. तिची संवेदनशीलता अभिमानाने फुलवतेच पण, समाजासाठी काम करण्याची प्रेरणा देते. नवी पिढी अशा प्रकारे घडताना पाहून मनात चांगल्या भविष्याची आशा जागृत झाल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले. लहान वयात अशी समज दाखवण कौतुकास्पद आहे.

बातम्या आणखी आहेत...