आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय बुद्धिबळपटूचा सत्कार:आठ वर्षीय विहान ​​​​​​​कटारियाचा स्नेहबंधच्या वतीने सन्मानपत्र व पदक देऊन सन्मान

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात खेळाडू म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर तीन गोष्टी महत्वाच्या असतात. कठोर परिश्रमाची तयारी, खेळावर नितांत प्रेम आणि आपल्या देशाविषयीचा अभिमान,या तीन गोष्टी कोणत्याही खेळाडूला यशाच्या शिखरावर पोहोचवते, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.

नगर येथील डॉ. वसंत कटारिया यांचा नातू व डॉ. अनिकेत कटारिया यांचा आठ वर्षीय मुलगा राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत खेळलेला खेळाडू विहान कटारिया याचा स्नेहबंधच्या वतीने सन्मानपत्र व पदक देऊन अध्यक्ष शिंदे यांनी सत्कार केला. याप्रसंगी डॉ. वसंत कटारिया, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. प्रज्ञा कटारिया, शिल्पकार बालाजी वल्लाल आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, अनेकांचे हे स्वप्न असते की मी मोठेपणी हे होईल, अमुक स्पर्धेत यश मिळवेल, पण विहानने आठ वर्षांच्या वयातच कठोर परिश्रम, खेळावर प्रेम आणि देशाचा अभिमान या तीन गोष्टी आत्मसात केल्या. आणि त्याच्यात खेळण्याची क्षमता होती, जिद्द होती, मोठ्यांचे आशीर्वाद त्याच्यासोबत होते. यामुळेच त्याने नगरचे आणि कुटुंबाचे नाव उज्जवल केले. यापुढेही चांगले यश मिळून त्याने यशाचे उंच शिखर गाठावे अशा शुभेच्छा अध्यक्ष उद्धव शिंदे दिल्या

बातम्या आणखी आहेत...