आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर येथील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात रविवारी 9 एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (11 एप्रिल) ला पाहणी केली. "एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येऊन 7 दिवसांत शेतकऱ्यांचा खात्यात मदत वितरित करण्यात येईल." असे आश्वासन शिंदे यांनी दिली.
पडक्या घरांची तात्पुरती उभारणी
पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले. वनकुटे मधील पडझळ झालेल्या 22 कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तात्काळ पक्के घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.
त्यांच्यासमवेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते .
पिकांचे आतोनात नुकसान
पावसाने वनकुटे गावातील घरांची पडझड झाली आहे . कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, कडवळ, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. शेतीमधील कांदा, मिरची यासह डाळिंब, संत्रा, आंबे, या फळपिकांच्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाणी केली.
शेतकऱ्यांना मदत
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नमो शेतकरी सन्मान योजनेत आता शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजारांची मदत देण्यात येत आहे. एक रूपयांत पीक विमा काढण्यात येत आहे . नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 10 हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यापुढेही मदत देण्यात येईल.
पंचनामे करण्याच्या सूचना
तातडीने पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने करावे. कांदा पीकांची सातबारा वर नोंद नसली तरी पंचनाम्यात नोंद घेऊन नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रशासनास दिल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.