आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारियल इस्टेट क्षेत्रात देशपातळीवर बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मांडणारी व ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम रावणारि संघटना म्हणून क्रेडाईची ओळख आहे. क्रेडाई महाराष्ट्र संघटनेची २०२३-२५ या वर्षासाठीची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली. क्रेडाईचे राष्ट्रीय चेअरमन सतिश मगर यांच्या मान्यतेने क्रेडाई महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी औरंगाबाद येथील प्रमोद खैरनार तर सहसचिवपदी नगरच्या आशिष पोखर्णा यांनी निवड करण्यात आली.पोखर्णा हे क्रेडाई अहमदनगरचे माजी अध्यक्ष आहेत.
दहा वर्षांपासून ते क्रेडाई महाराष्ट्रच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी क्रेडाई महाराष्ट्र व क्रेडाई अहमदनगरसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत व त्यांच्या कामाचा अनुभव पाहता त्यांची प्रथमच क्रेडाई महाराष्ट्रच्या सहसचिवपदी निवड झाली. या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना पोखर्णा म्हणाले, माझ्यावर क्रेडाई महाराष्ट्रच्या सहसचिवपदाची जबाबदारी विश्वासाने सोपवली आहे. हा विश्वास सार्थ ठरवणारे काम करण्याचा प्रयत्न राहील. या पदाच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांचे व ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.