आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचा खर्च सरकारने करावा:मुख्यमंत्री अन् पंतप्रधानसुद्धा जनतेतूनच निवडा, विरोधी पक्षनेते अजित पवारांचा टोला

श्रीगोंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरपंच, नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता महापौर, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री व पंतप्रधान हेही थेट जनतेतूनच करावे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला शनिवारी लगावला.

बाजार समितीसाठी सर्व शेतकऱ्यांनी मतदान करावे हे सध्याच्या सरकारचे धोरण आहे. काही बाजार समित्यांत कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. मग निवडणुकीला खर्च कुठून करणार ? त्यासाठी शासनाने बाजार समितीच्या निवडणुकीचा खर्च करावा आणि सर्व शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार द्यावा, असे पवार म्हणाले. श्रीगोंदेतील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शनिवारी राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती प्रविणकुमार ऊर्फ बाळासाहेब नाहटा व शरद नवले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पार पडला या वेळी पवार बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्याच सैनिकांनी दिला धोका

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा व्हावा हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. उद्धव ठाकरे यांनी ते स्वप्न पूर्ण केले. परंतु बाळासाहेबांच्या मुलास त्यांच्याच शिवसैनिकांनी धोका देऊन दगाफटका केला आणि आघाडी सरकार कोसळले, असा आरोप पवार यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...