आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:संत जनार्दन स्वामी पतसंस्थेच्या‎ अध्यक्षपदी गुरसळ यांची निवड‎

कोपरगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी‎ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र‎ गहिणाजी गुरसळ यांची, तर‎ उपाध्यक्षपदी आनंदा गोकुळ चव्हाण‎ यांची बिनविरोध निवड झा ली.‎ संस्थेची नुकतीच पंचवार्षिक‎ निवडणूक बिनविरोध पार पडली.‎ संस्थेच्या संचालक मंडळामध्ये‎ मिलनकुमार दौलतराव चव्हाण,‎ शिवाजी मच्छिंद्र वक्ते, राजेंद्र‎ गहिनाजी गुरसळ, आनंदा गोकुळ‎ चव्हाण, शिवाजी रामचंद्र शिरसाट,‎ सुनील वसंतराव नाईक, सुभाष‎ बापूराव शिंदे, दीपक सीताराम‎ गायकवाड, मनीषा राजेंद्र‎ गायकवाड, कविता दादासाहेब‎ पवार, अशोक बाबुराव आव्हाड‎ यांची बिनविरोध वर्णी लागली.‎

काल संस्थेच्या सभागृहामध्ये‎ अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची‎ निवडणूक बिनविरोध पार पडली.‎ निवडणूक प्रक्रियेचे कामकाज‎ निवडणूक निर्णय अधिकारी‎ सहाय्यक निबंधक एन. जी. ठोंबळ‎ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक‎ उपनिबंधक रहाणे यांनी पाहिले.‎ त्यांना संस्थेचे व्यवस्थापक‎ बाळासाहेब जाधव यांनी मदत‎ केली. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक‎ मिलनकुमार चव्हाण, कोल्हे‎ सहकारी साखर कारखान्याचे माजी‎ संचालक मधुकर वक्ते, दादासाहेब‎ पवार, माजी अध्यक्ष शिवाजी वक्ते‎ अादी उपस्थित होते. संस्थेचे‎ मार्गदर्शक मिलनकुमार चव्हाण‎ यांनी अध्यक्ष गुरसळ व उपाध्यक्ष‎ चव्हाण यांना अध्यक्ष, उपाध्यक्ष‎ पदाचा पदभार दिला. संस्थेच्या‎ वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार‎ करण्यात आला. यावेळी‎ मिलनकुमार चव्हाण म्हणाले,‎ संस्था ही सभासदांची जननी असून‎ ठेवीदार व कर्जारांचा विश्वास‎ संस्थेने मिळवला.‎

बातम्या आणखी आहेत...