आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:जनजागर सरपंच असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी किशोर गाडे यांची निवड

कोपरगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चासनळी येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर रावसाहेब गाडे यांची महाराष्ट्र राज्य सरपंच व सदस्य असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विकास गरड व मार्गदर्शक कैलास गोरे यांनी त्यांना हे नियुक्तीपत्र दिले. किशोर गाडे हे चासनळी येथील रहिवासी असुन त्यांचा अहमदनगर जिल्हयातील विविध सामाजिक कार्यात सहभाग असतो.

जिल्हयातील ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच व सदस्यांना उदभवणा-या अडचणींची सोडवणुक या माध्यमांतून करण्यांत येणार आहे.नाशिकच्या कृषीसेवक बळीराजा आत्मसन्मान सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रताप दिघावकर यांनीही त्यांची अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून तसे पत्र दिले आहे. या दोन्ही संघटनेच्या माध्यमांतुन सामाजिक कार्यात राहून अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात भर घालू, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...