आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेवासा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी मोहन गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीत पत्रकारांसाठी विविध उपक्रमांविषयी चर्चा, विविध विषयांवरील पत्रकार परिषदांचे आयोजन आणि पत्रकार परिषदांसाठीचे नियोजन, शहरातील पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न, पत्रकार संरक्षण कायद्याचा पाठपुरावा, पत्रकार वसाहतीचा प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.
अशोक डहाळे यांनी प्रास्ताविक करून संघाच्या कामकाजाची माहिती सांगितली. यावेळी प्रेस क्लब कार्यकारणी उपाध्यक्षपदी कैलास शिंदे (पुढारी) व नाना पवार (प्रभात), सरचिटणीसपदी अशोक डहाळे (सामना), सहसचिवपदी सुहास पठाडे (लोकमत), खजिनदारपदी शाम मापारी (पुण्यनगरी), संघटकपदी मकरंद देशपांडे (सार्वमत) यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष सुधीर चव्हाण, पवन गरूड, रमेश शिंदे, संदिप वाखुरे, अभिषेक गाडेकर हे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.