आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी श्याम भोसले यांची निवड

श्रीगोंदे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

थिटे सांगवी तालुका श्रीगोंदे येथील रहिवासी व सिद्धटेक आणि जलालपूर तालुका कर्जत येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत असलेले श्याम भोसले यांची अहमदनगर जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा थिटे सांगवी येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस पाटील शिवाजी वाळके , गोरख वाळके, ग्रामपंचायत सदस्य मधुकर उगले, आत्माराम ससाणे, दिलीप देवकाते, नाना उगले, विठ्ठल जरांगे, नवनाथ वाळके, कैलास वाळके, संदीप वाळके मेजर आदी उपस्थित होते. जन्मभूमीत झालेल्या सन्मानने भारावून गेल्याची प्रतिक्रिया भोसले यांनी यावेळी दिली.

बातम्या आणखी आहेत...