आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:शेतातील विजेचे खांब; रोहित्र आणि वाहिन्यांच्या भाड्याची मागणी करा

कौठा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विजेचे खांब, रोहित्र, विजेचे मनोरे व त्यासाठीच्या वीज वाहिन्या (तारा) आहेत, त्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे जागा भाडे मागणी करावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित बबनराव काळे यांनी केले. नेवासे तालुक्यातील सौंदाळा येथे माजी सरपंच शरदराव आरगडे यांच्या पुढाकारातुन परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटनेच्या सहकार्याने शेतातील वीज पुरवठा करणाऱ्या साहित्याचे भाडे मिळण्याचे आभियानास २७ ऑगस्ट रोजी प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाकपचे ज्येष्ठ नेते व राज्य कौन्सिलचे बाबा आरगडे होते. यावेळी शेतकरी नेते हरिभाऊ तुवर, तालुकाध्यक्ष त्र्यंबक भदगले, बाबासाहेब कोतकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, कॉम्रेड अप्पासाहेब वाबळे, भारत आरगडे, बाळासाहेब आरगडे, कारभारी गरड आदी उपस्थित होते.

ऑगस्ट २०२२ मध्ये औरंगाबाद खंडपीठाने अशा भाडे मागणी अर्जावर जिल्हाधिकारी यांनी ९० दिवसांच्या आत निर्णय देण्याचे आदेश दिले. यापुढे थकलेले वीजबिल मागणीसाठी कुणी आल्यास त्यांना वीज पुरवठा घेतल्यापासूनचे जागा भाडे मागा, असे आवाहनही काळे यांनी केले. महावितरणकडून सर्वाधिक मालमत्ता कर वसूल करणारी सौंदाळा एकमेव ग्रामपंचायत आहे. या अभियानास पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आयोजक शरद आरगडे म्हणाले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ आरगडे, सचिन आरगडे, बाळासाहेब बोधक, रामकिसन चामुटे, बबन आरगडे, चंद्रकांत आरगडे, अॅड. किशोर चामुटे, वकिल पांडुरंग औताडे, भागचंद चामुटे, किशोर आरगडे, वेणुनाथ माळी, ज्ञानेश्वर वाकचौरे, सुनील आरगडे, उत्तम आरगडे, शिवाजी आरगडे, जालिंदर आरगडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...