आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिता मिटली:अकरावी प्रवेश : 480 महाविद्यालयांत 1 लाख प्रवेश क्षमता ; जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाची माहिती

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील नियमीत तसेच पुनरर्परीक्षेतील ६७ हजार ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाची तयारी माध्यमिक शिक्षण विभागाने केली आहे. जिल्ह्यातील ४८० महाविद्यालयात अकरावी प्रवेश क्षमता तब्बल एक लाखांपर्यंत आहे. कोणताही विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नाही, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभाग प्रशासनाने ‘दिव्य मराठी’ला दिली. दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत जिल्हा भरातून ६६ हजार ५४९ नियमीत विद्यार्थी तर १ हजार २५१ पुनरर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांनी मोबाईल तसेच सायबर कॅफेत निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पुढील उच्च शिक्षणाच्या अनेक वाटा खुल्या आहेत. त्यात शासकीय तंत्रनिकेत, आयटीआयसह विविध अभ्यासक्रमही आहेत. त्याबरोबरच कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ४७३ असून त्यात अनुदानित, अंशत: अनुदानित, विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित महाविद्यालयांचा समावेश आहे. कला शाखेत ३३ हजार ९८७, वाणिज्य शाखेत १३ हजार ३०८ तर विज्ञान शाखेत ५७ हजार ७१४ प्रवेश क्षमता उपलब्ध आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्रवेश क्षमता एक लाखांवर असल्याने उत्तीर्ण झालेल्या ६७ हजार ५० उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभाग प्रशासनाने दिली.

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार ^ जिल्ह्यात अकरावी प्रवेशाची क्षमता १ लाखांवर असून कोणीही प्रवेशाविना राहणार नाही. अकरावीच्या सर्व शाखांमध्ये मुबलक जागा आहे. तसेच काही विद्यार्थी पॉलिटेक्निक, आयटीआयसह इतर अनेक अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेतात. लवकरच अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने तयारी केली.'' अशोक कडूस, जिल्हा शिक्षणाकारी, माध्यमिक.

बातम्या आणखी आहेत...