आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभिंगार येथील नगर-पाथर्डी महामार्गावर अनधिकृतपणे बसणाऱ्या भाजी-फळ विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन वारंवार लहान-मोठे अपघात घडतात. त्यांना त्वरीत हटवून दिलेल्या पर्यायी जागेत स्थलांतर करण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहायक निरिक्षक शिशीरकुमार देशमुख यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, उपाध्यक्ष राहुल लखन, सचिव विक्रम चव्हाण, प्रशांत पाटोळे, शैलेश घावरी, दीपक नकवाल, धीरज बैद, संजय खरे आदी उपस्थित होते. देशमुख यांनी रस्त्यावरील भाजी-फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण कॅन्टोमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोलून हटविण्याचे आश्वासन दिले. भिंगार उपनगरात भाजी-फळ विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिकांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन होत आहे. रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालत असून, भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक रस्त्यावर येतात. विद्यार्थ्यांना जीव मुठित धरुन शाळेत जावे लागत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.