आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावरच व्यवसाय सुरू केल्याने पेच:श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावर काम करताना ठेकेदाराची कसरत

श्रीरामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण काही प्रमाणात काढले असले तरी रस्त्यालगतच्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय रस्त्यावरच सुरू केल्याने पुन्हा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम आमदार लहू कानडे यांच्या पुढाकाराने सुरु झाले आहे. या कामातील महत्वाचा अडथळा ठरणारे श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील वेस ते मोसंबी बाग या दरम्यानचे अतिक्रमण बांधकाम विभागाने काही प्रमणात काढले. मात्र काही ठिकाणी फक्त रस्ता काम करण्यासाठी आवश्यक अतिक्रमण काढून ठेकेदाराने काम चालू केले आहे. मग साईड पट्ट्यांचे काय? या रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहन दुरुस्ती करणारांनी व्यावसाय थाटले आहेत. या व्यावसायिकांच्या शेडचे समोरचे अतिक्रमण काढले असले तरी हे व्यावसायिक रस्त्यावरच वाहने उभी करून आपला व्यवसाय करत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदारास मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. काही व्यावसायिक रस्त्याचे काम करणार्‍यांना जुमानत नसल्याने रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला जाईल की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता या रस्त्याचे काम करताना बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम एकत्रीत राबवून संपूर्ण अतिक्रमण काढायला हवे होते.

बातम्या आणखी आहेत...