आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर:श्रीगोंदे येथील सीएनजी पंपावरीलकर्मचाऱ्यांनी केले ग्राहकांचे दागिने परत

श्रीगोंदे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे शहरात काष्टीरोड लगत बीजीआरएल कंपनीचा सीएनजी पंप, मदर स्टेशन नुकतेच सुरू झाले आहे. येथील कर्मचारी पंकज रासकर आणि गणेश बोत्रे हे कामावर असताना एक ग्राहकांच्या पत्नीचे तीन टोळ्याचे मंगळसूत्र खाली पडले होते. हे ग्राहक तसेच निघून गेल्यावर हे मंगळसूत्र दोन्ही कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित ठेवले. त्यांनंतर हे हरवलेले मंगळसूत्र शोधण्यासाठी आल्यावर संबंधित ग्राहकांच्या पत्नीचे मंगळसूत्र या दोन्ही कर्मचाऱ्यांनी परत दिले. श्रीगोंदे-काष्टी रस्त्यालगत भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड कंपनीचा सीएनजी पंप मदर स्टेशन असून या पंपावर सीनजी गॅस भरण्यासाठी गर्दी असते. शनिवारी सकाळी एक ग्राहक आपल्या कुटुंबासह गॅस भरण्यासाठी आले होते. गॅस भरून जाताना त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील तीन टोळ्याचे मंगळसूत्र खाली पडले, हे ग्राहकांच्या पत्नीच्या लक्षात आले नाही. ते ग्राहक निघून गेले. मात्र, काही वेळात पंपावरील कर्मचारी पंकज रासकर याना हे सोन्याचे दागिने सापडले. त्यांनी ते व्यवस्थित ठेवले काही वेळातच ते ग्राहक आणि महिला पंपावर परत आल्यावर त्यांनी दागिना सापडला आहे का, अशी चौकशी करत असताना येथील कर्मचारी पंकज रासकर आणि गणेश बोत्रे यांनी हे मंगळसूत्र त्या ग्राहकाला परत दिले. त्या ग्राहकाने ही आंनद व्यक्त करत आभार मानले. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कंपनीच्या अधिकारी तसेच उद्योजक कैलास गाडीलकर, आकाश बोरुडे, स्वप्नील गाडीलकर यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...