आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:कोंढवडच्या स्वयंसहाय्यता महिला समुहांना प्रोत्साहनपर मदत

राहुरी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोंढवड येथील महिला बचत गटांना गावातील जेष्ठ नागरिकांनी आर्थिक स्वरूपात मदतीचा हात दिला आहे. महिला स्वयंसहाय्यता समुहांना कर्ज वितरण करण्यासंदर्भात कोंढवड येथे महिलांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अभिजित गर्जे, राधिका म्हसे यांनी कर्ज प्रकरणाबाबत महिलांना मार्गदर्शन केले.

महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या माध्यमातून गावातील महिलांची आर्थिक प्रगती होऊन कुटुंबाला या माध्यमातून हातभार लाभावा या हेतूने गावातील दशरथ म्हसे, गोरक्षनाथ माळवदे, शंकर औटी यांनी तीन गटांना प्रोत्साहनपर आर्थिक स्वरूपात मदत केली आहे. यावेळी राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा वैशाली म्हसे, मंगल म्हसे, शोभा म्हसे, जया म्हसे, रूपाली म्हसे, मंगल सुनिल म्हसे, जिजाबाई म्हसे, स्वाती म्हसे, मुक्ताबाई म्हसे, उमा म्हसे, भारती पवार, शितल औटी, मीना म्हसे, स्वाती औटी, अलका म्हसे, उमा पवार आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...