आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन राष्ट्रसंत व भारत गौरव, प्रखर वक्ते पूलक सागर महाराज यांचे विचार अत्यंत प्रभावी असून त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. भारत गौरव पुलक सागर महाराजांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा बुधवारी संजिवनी उद्योग समूह व कोपरगाव शहर तालुकावासियांच्या वतीने गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांच्या वाढदिवसाची आठवण म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पेस्टीसाईडस असोसिएशनचे कैलास ठोळे, कोपरगाव बार असोसिएशन अॅड. जयंत जोशी, मनसेचे संतोष गंगवाल, मणिकचंद ग्रूपच्या शोभा धाडीवाल, पंच अशोक पापडीवाल, रेखा काले, सत्येन मुंदडा, विजय बंब, पी. सी. ठोळे, पंच महावीर दगडे, शोभना ठोळे, मंजू काले, दिलीप अजमेरे, महावीर काले, अतुल काले, अजित लोहाडे, जितेंद्र कासलीवाल, फुलचंद पांडे, विशाल बडजाते, सुशांत घोडके, सचिन अजमेरे आदी उपस्थित होते. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव आणि जैन समाज एक अतूट नाते आहे. येथील महावीर मंदिरात आजवर अनेक जैन राष्ट्रसंतांनी हजेरी लावून आपल्या प्रभावी विचारांनी सर्व समाजातील घटकांना उच्चविचारांची प्रेरणा देऊन योग्य दिशा देण्याचे काम केले. आज प्रत्येकजण मानसिक स्वास्थ हरवून बसला. भगवान महावीरांनी दिलेली शिकवण आणि भारतगौरव पूलकसागर महाराज महावीरांच्या विचार प्रसाराचे जे काम करीत आहेत. त्यातून जीवन कसे जगावे याची शिकवण मिळते. संत हे समाजातील अपप्रवृत्ती नष्ट करून जीवन जगण्याच्या विचारांना बळ देतात. अतुल काले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.