आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेवासे:हरिपाठाचा इंग्रजी अनुवाद जगाला आनंद देईल : मारुतीबाबा कुऱ्हेकर

नेवासे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ सर्व जीवांना आनंद देणारा असून डॉ. रविदास महाराज शिरसाठ यांनी इंग्रजीत केलेल्या भाषांतरामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल, असा शुभाशीर्वाद आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक शांतीब्रम्ह गुरुवर्य मारुतीबाबा कुऱ्हेकर यांनी यावेळी दिला.

नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र भावामृत ज्ञानयज्ञ कथा सोहळयात इंग्रजी हरिपाठाचे प्रकाशन आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मारुतीबाबा कुऱ्हेकर, अध्यापक डॉ. मारुती महाराज मुखेकर, सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज, मध्यमेश्वर मंदिर देवस्थानचे महंत ऋषीनाथजी महाराज, खडेश्वरी देवस्थानचे महंत गणेशानंद महाराज, रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिनिधी सोनवणे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. रविदास महाराज शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. समितीचे अध्यक्ष संतोष काळे, उपाध्यक्ष सुभाषराव मते, अनिलराव ताके, नानासाहेब डौले, बापूसाहेब दारकुंडे, राजेंद्र टेमक, किशोर गारुळे, प्रवीण बोरकर यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले. सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले. सोहळा समितीचे सदस्य अनिलराव ताके यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...