आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरामध्ये सुरू असलेल्या बिंगो जुगारावर विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या पथकाने केलेल्या कारवाईच्या गुन्ह्यात आणखी वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
विशेष पथकाने केलेल्या कारवाई प्रकरणी ज्ञानेश्वर वसंतराव तनपुरे, राकेश बालराज गुंडू, निलेश कृष्णा लोखंडे, आनंद लोढा, पंडित पोकळे, शाम बाळू अडागळे, विजय लक्ष्मण शिंदे, विकास दिलीप भिंगारदिवे, यासीन रजक शेख, अशोक दामोदर कावळे, रामभाऊ सदाशिव घुले,प्रवीण अनिल टेकाळे, बाबा महबूब शेख, प्रकाश बबन गायकवाड, महेंद्र माखीजा, कैलास जावळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक बापू रोहोम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जाधव, अंमलदार शकील अहमद शेख, सचिन धारणकर, प्रमोद मंडलिक, कुनाल मराठे यांनी केली होती. या प्रकरणात आता कलम १७४, १७७, १८१, १८२, १८८ तसेच ४१९ आदी वाढीव कलम लावण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.