आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशोत्सव:‘पार्वतीबाई डहाणूकर’ कन्या विद्यालयात नवीन विद्यार्थिनींचा प्रवेशोत्सव ; शैक्षणिक साहित्य वाटप

नगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणतेही काम हे मनापासून प्रामाणिकपणे आणि कष्टाची तयारी ठेवून केले तर यश मिळतेच, असे प्रतिपादन उद्योजक सुरेश जाधव यांनी केले. येथील श्रीमती पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालयातील नव्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका रोहिणी फळे होत्या. फळे यांनी नवीन विद्यार्थिनींना विद्यालयातील विविध उपक्रम व स्पर्धांची माहिती दिली व शहरात फक्त मुलींसाठी असलेल्या पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालयात गुलाबपुष्प देऊन मुलींचे स्वागत केले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका वैशाली दारवेकर यांनी संपूर्ण शाळेच्या डिजिटलायझेशन विषयी माहिती सांगितली.

बातम्या आणखी आहेत...