आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय परिषद:ब्रोम्होद्योग परिषदेत उद्योजकांनी सामील व्हावे‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या ब्राम्हण समाजही व्यापार- उद्योग क्षेत्रात‎ आघाडीवर आहेत. देशातील ब्राम्हण‎ उद्योजकांसाठी व्यावसायिक जाळे तयार‎ करण्यासाठी, व्यवसाय मार्गदर्शन व तंत्रज्ञान‎ नेटवर्किंग मिळावे, यासाठी अखिल भारतीय‎ ब्राम्हण महासंघातर्फे देशभरातील ब्राम्हण‎ उद्योजकांसाठी दिल्लीमध्ये ‘ब्रोम्होद्योग २०२३’‎ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.

२५‎ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान ही राष्ट्रीय उद्योग‎ परिषद होणार असून, त्यात नगर शहर व‎ जिल्ह्यातील उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे‎ आवाहन अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे‎ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी‎ दिली.‎ अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने‎ दिल्ली येथे होणाऱ्या ब्रोम्होद्योग २०२३ या राष्ट्रीय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ परिषदेची माहिती ‘एमआयडीसी’मधील‎ उद्योजकांना देण्यासाठी डॉ. कुलकर्णी यांनी‎ उद्योजकांची भेट घेतली.

त्यावेळी ते बोलत‎ होते. एल अँड टी कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक‎ अरविंद पारगावकर अध्यक्षस्थानी होते.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मधुसूदन मुळे,‎ महासंघाच्या उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष‎ श्रीकृष्ण जोशी आदींसह उद्योजक उपस्थित‎ होते.‎ अरविंद पारगावकर म्हणाले, “भारत मोठी‎ औद्योगिक क्रांती झाली असून, उद्योग क्षेत्राला‎ चालना मिळत आहे.

त्यातून नवे उद्योजक‎ तयार व्हावेत, यासाठी अखिल भारतीय ब्राम्हण‎ महासंघ प्रयत्न करीत आहे. महासंघाच्या वतीने‎ होणाऱ्या ब्रोम्होद्योग राष्ट्रीय परिषदेमुळे मोठ्या‎ प्रमाणात उद्योगांना चालना मिळणार आहे.”‎ प्रास्ताविकात श्रीकृष्ण जोशी म्हणाले, की‎ अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या‎ माध्यमातून ब्राम्हण समाजाचे प्रश्न‎ सोडवण्यासह समाज उन्नतीसाठी प्रयत्न होत‎ आहेत. ब्रोम्होद्योग परिषद हा उद्योगांना चालना‎ देणारा प्रकल्प असून, त्याद्वारे एकमेकांना‎ सहकार्य करून ब्राम्हण व्यावसायिक आपला‎ व्यवसाय उद्योग वाढवू शकतात. प्रा. मधुसूदन‎ मुळे यांनी महासंघाच्या कार्याची सविस्तर‎ माहिती दिली. सूत्रसंचालन नगर जिल्हा‎ कार्याध्यक्ष रघुनाथ सातपुते यांनी केले. आकाश‎ जोशी यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...