आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:नगर-मनमाड महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंद

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर मनमाड राज्य महामार्ग दुरूस्तीचे काम सुरू असल्याने शनिवारपर्यंत, १२ नोव्हेंबर या महामार्गावर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार जड वाहनांना या मार्गावर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. नगर मनमाड राज्या महामार्गावर महाराष्ट्रासह परराज्यातील मालवाहतूक सुरू असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा अंतर्गत नगर मनमाड राज्य महामार्गाच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे. या मार्गावर अवजड वाहतुक सुरू असल्याने रस्ता दुरुस्ती कामात अडथळे येत आहेत.

नांदगाव ते विळद बायपास पर्यंतचे दुरूस्ती काम झाले आहे. पुढील राहुरी दिशेला वांबोरी फाटा, कोल्हार, बाभळेश्वर या भागातील रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. अवजड वाहतुकीमुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प तसेच अपघाताची शक्यता असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिंगणापूर, सोनई येथून राहुरी मार्गावर येणारी अवजड वाहतूक नगर औरंगाबाद मार्गाने वळवण्यात आली आहे.

लोणी,बाभळेश्वर,श्रीरामपूरकडून नगरला जाणारी अवजड वाहतूक बाभळेश्वर, श्रीरामपूर, टाकळीभान, नेवासेमार्गे नगर दिशेला वळवण्यात आलेली आहे. १२ नोव्हेंबरपर्यंत नगर मनमाड राज्य महामार्गावरील जड वाहतुक बंदीत उसाच्या ट्रकला वगळण्यात आल्याचे दराडे यांनी सांगितले.दरम्यान, या रस्ताच्या कामासाठी केंद्राने नव्याने ८०० कोटी रुपयंचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याच्या कामाला जानेवारी महिन्यात सुरुवात होईल्, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी वाहनधारकांची आहे.

बातम्या आणखी आहेत...