आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर कारखान्याचे अध्यक्ष:धामोरी येथील काळे गटाच्या कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश

कोपरगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील धामोरी येथील गुरूदत्त पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय निवृत्ती शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजप, कोल्हे गटात प्रवेश केला.

त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिलीप शेलार, राजेंद्र शेलार व प्रदीप दत्तात्रय भुसे यांनी कोल्हे गटात प्रवेश केला. दत्तात्रय शेलार म्हणाले, कोल्हे कारखान्यांच्या अध्यक्षपदाची धूरा विवेक कोल्हे यांच्या खांद्यावर आली अाहे. त्यांनी युवकांचे संघटन उत्तमरित्या करून तालुक्यावर कोसळलेल्या प्रत्येक आपत्तीत येथील रहिवासीयांचे संकट हरण करण्यांसाठी प्रयत्न केले.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सत्ता असो अगर नसो पण येथील प्रत्येक कार्यकर्ता हा आपला आहे. त्याच्या सुख-दुःखात वेळप्रसंगी त्याच्या मागे उभे राहण्यांत मोलाची भूमिका बजावली आहे. विवेक कोल्हे म्हणाले, भाजप जगात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील प्रत्येकाचा विचार करून त्यांच्या विकासाला सर्वप्रथम प्राधान्य दिले.

बातम्या आणखी आहेत...