आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये लम्पीचा शिरकाव:54 गावातील 67 जनावरांना बाधा, माणसाला धोका नसल्याचे पशुसंवर्धन कार्यालयाने केले स्पष्ट

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जनावरांमधून जनावरांमध्ये पसरणाऱ्या लम्पी आजाराने पशुपालकांची चिंता वाढवली आहे. अहमदनगर जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत तब्बल 67 जनावरांना लम्पीची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक लसीकरणाची खात्री झाल्याशिवाय जनावरांची खरेदी-विक्री करता येणार नाही असे स्पष्ट केले आहे.

हा आजार जनावरांमध्येच पसरत असल्याने, त्याचा माणसाला धोका नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाने स्पष्ट केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात फऱ्या व लम्पी आजाराचा प्रादूर्भाव झाल्याकडे पुणे येथील रोग अन्वेषण विभागाचे सहआयुक्तांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे तातडीने लम्पी रोग प्रादूर्भावाच्या पाच किलोमिटर परिसरातील टाकळी, आगार व खानापूर ही गावे सतर्क क्षेत्र म्हणून घोषीत केली आहेत.

लम्पी हा आजार नवा नसून अहमदनगर जिल्ह्यास देशभरात विविध ठिकाणी दरवर्षी या रोगाची बाधा झाल्याचे दिसून येते. परंतु यंदा या आजारामुळे जनावरे दगावल्याची घटना प्रथमच घडल्याने धास्ती वाढली आहे. अहमदनगर जिल्ह्यात अद्याप लम्पीमुळे एकाही जनावराचा मृत्यू झाला नाही, परंतु यापूर्वी जळगाव जिल्ह्यात जनावरे दगावल्याची घटना घडली होती. पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या लसीकरणावर भर दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 34 हजार 223 जनावरांना लस टोचण्यात आली असून सद्यस्थितीत 52 हजार लसचे डोस उपलब्ध आहेत.

मानवाला धोका नाही

लम्पी आजाराने बाधीत झालेल्या जनावराची माहिती तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अतवा 1962 या टोलफ्री क्रमांकावर कळवावी. लवकर उपचार मिळाले तर जनावरे दगावणार नाहीत. हा रोग केवळ गायी व म्हैस वर्गीय जनावरांमध्येच प्रसारीत होतो. जनावरांमधून मानसाला हा आजार होत नाही. असे पशुसंवर्धन उपायुक्त एस. के. तुभारे यांनी सांगितले आहे.

तीन वर्षांत लम्पीचा वाढता आलेख

अहमदनगर जिल्ह्यात सर्वप्रथम 25 ऑगस्ट 2020 मध्ये बोधेगावमधील जनावराला सर्वप्रथम लम्पी आजाराची बाधा झाल्याचे समोर आले होते. 2020 मध्ये जिल्ह्यातील 32 गावात 196 जनावरे बाधीत झाली होती. त्याचप्रमाणे 2021 मध्ये 27 गावातील 441 जनावरे तर 2022 मध्ये आतापर्यंत 54 गावांत 67 जनावरांना बाधा झाली. हा आकडा वाढत आहे.

असे होते लम्पी आजाराचे निदान

जनावरांच्या नाकातील व डोळ्यातील स्वॅब घेतले जातात. तसेच जनावरांचे रक्ताचेही नमुणे संकलीत केले जातात. हे नमुणे पश्चिम विभागीय रोग निदान शाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. आठ ते बारा तासात अहवाल समोर येतो.

ही लक्षणे दिसली तर सावधान

जनावरांना ताप आल्याने दूध उत्पादनात घट होऊ शकते. संक्रमित जनावरांना पोट, पाठ, पाय मान, डोके आदी भागात त्वचेवर गोलाकार गाठी दिसून येतात. ही लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. कारण ही लक्षणे लम्पीचीही असू शकतात. असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...