आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारी समता नागरी सहकारी पतसंस्थेने ३७ व्या वर्षात पदार्पण केले असून समताच्या ठेवीदारांच्या ठेवी समताच्या अभेद्य सुरक्षा कवचामुळे अधिक सुरक्षित झाल्या आहेत. भविष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद समतात आहे, असे प्रतिपादन अकोला जिल्ह्यातील निशांत मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी काढले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त समता इंटरनॅशनल स्कूल येथे समता ग्राहक कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी भूषवले. सूत्रसंचालन संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केले. समताच्या सोहळ्याला ६ हजाराच्यावर सभासद, ठेवीदार उपस्थित होते. यावेळी प्रेरणा पतसंस्थेचे सुरेश वाबळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे शिवाजी कपाळे, मंगलनाथ मल्टीस्टेटचे रवींद्र कानडे, तुळजाभवानी मल्टीस्टेटचे चंद्रकांत शेजुळ, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे श्रीकांत साखरे, तुळजाई अर्बन मल्टीस्टेटचे राकेश न्याती, समता रुरल मल्टीस्टेटचे विठ्ठल अभंग, राघवेश्वर पतसंस्थेचे गोपीनाथ निळकंठ, सुरज पतसंस्थेचे अशोक कोठारी, मंदावी पतसंस्थेचे आशुतोष पटवर्धन, तहसीलदार विजय बोरुडे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, सहायक निबंधक एन. जी. ठोंबळ, बिडीओ सचिन सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.