आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाहेश्वरी समाजाच्या वंशोत्पत्ती उत्सव निमित्त शहरातील माहेश्वरी बांधवांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. शहरातून भगवान महेशाच्या प्रतिमेची मिरवणूक निघून राम मंदिरात समारोप झाला. महाआरती नंतर महाप्रसाद कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली. ज्येष्ठ शुद्ध नवमीला दरवर्षी समाज बांधवाकडून उत्सव साजरा होतो. नवमी उत्सवानिमित्त निबंधस्पर्धा,भजन स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यामधील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. नवीपेठे मधून प्रतिमा मिरवणुकीला प्रारंभ झाला. जिल्हा बँक चौक,नाईक चौक,मेनरोड मार्गे मिरवणूक निघाली.मिरवणूक मार्गावर लालकृष्ण पतसंस्था,व्यापारी मंडळाने पिण्याचे पाणी व थंडपेयाचे वाटप केले.माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,ज्येष्ठ नेते अशोक गर्जे,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दुधाळ, माजी नगरसेवक चांद मणियार, ज्येष्ठ साहित्यिक रामकिसन शिरसाठ,सामाजिक कार्यकर्ते डॉ. बंडुशेठ भांडकर,तिलोक जैन संस्थेचे सचिव सतिष गुगळे आदींनी प्रतिमा पूजन करून समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. माहेश्वरी पंच ट्रस्ट,माहेश्वरी तालुका सभा,महिला मंडळ,युवक मंडळ,राम मंदिर ट्रस्ट आदी संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.