आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:पोलिस उपअधीक्षक स्तरावर भरोसा सेल उभारा;विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे निर्देश

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीडित महिलांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर भरोसा सेल कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांच्या मदतीसाठी पोलिस उपअधीक्षक स्तरावर भरोसा सेल उभारण्यात यावेत. तसेच विद्यार्थिंनींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात सेफ कॅम्पस सुरू करावेत, असे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.महापौर रोहिणी शेंडगे, पोलिस अधीक्षक राकेश ओला, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सभापती पुष्पा बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, हिंसाचाराचे लक्ष्य ठरलेल्या महिला व मुलांना भरोसा सेलच्या आधारामुळे अत्याचाराविरुध्द लढण्यासाठी मानसिक बळ निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील महिला व मुलांनाही या भरोसा सेलपर्यंत वेळेत पोहोचणे शक्य होत नाही.

त्यामुळे प्रत्येक पोलिस उपविभागीय अधिकारी स्तरावर भरोसा सेल कार्यान्वित करण्यात येऊन या सेलच्या माध्यमातून पीडित महिला व बालकांना आधार देण्याचे काम करण्याच्या सुचनाही डॉ. गोऱ्हे यांनी केल्या. महाविद्यालयांमधून विद्यार्थींनींना छेडण्याचे अनेक प्रकार घडतात. अशावेळी या मुली पोलिस ठाण्यात येऊन तक्रार करण्यास घाबरतात. या मुलींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये सेफ कॅम्पस उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात यावा. असे त्यांनी सांगितले. कोिवडमुळे ज्यांना पती गमवावा लागला अशा एकल महिलांना त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शेतकरी आत्महत्याच्या प्रलंबित प्रकरणावर कार्यवाही करा
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील ८४ वारसांनी मदत मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जापैकी ४१ वारसांना मदत देण्यात आली आहे. २३ प्रकरणे अपात्र ठरली असुन २० प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर कार्यवाही करत वारसांना तातडीने मदत देण्यात यावी. तसेच जी प्रकरणे शासन नियमानुसार अपात्र ठरली आहेत, अशा कुटुंबियांसोबत संवाद साधून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करण्याच्या सुचनाही डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...