आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व राजूर जि. प. गटातील सदस्य सुनीता अशोकराव भांगरे यांच्या नेतृत्वाखाली व यशवंत युथ फाउंडेशनच्या संकल्पनेतून महिला बचत गटांतील महिलांना स्वावलंबनासाठी कुटीरोद्योग व स्थानिक व्यवसायांवर आधारित प्रशिक्षण देण्याची मोहीम २ वर्षांपासून सुरू आहे. गावोगाव राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शाखा स्थापून महिलांचा सहभाग वाढवून राष्ट्रवादीची ताकद वाढवत आहेत. याच त्रिसूत्रीतून सुनीता भांंगरे यांनी २ वर्षांत तालुक्यात ५५ गावांत महिलांचे प्रबोधन व महिलांचे संघटन यशस्वी करून दाखवले, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुनीता अशोकराव भांगरे यांनी केले.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माध्यमातून लव्हाळवाडी येथे शाखा उद्घाटनाचे अर्धशतक पूर्ण करण्यात आल्याने या कामात विशेष योगदान दिलेल्या ५० आदिवासी महिलांना सुनीता भांगरे यांच्या हस्ते महिलांना लुगडे देऊन सन्मानित करण्यात आले. कुरडई, शेवया व इतर खाद्यपदार्थ तयार करण्यास मदतगार ठरणारे ५० मेटल सोऱ्यांचे मोफत वाटप सुनीता भांगरे यांनी केले. यावेळी नागली धान्यापासून तयार करण्यात येणारे विविध १६ पद्धतीचे खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन सुनीता भांगरे यांनी स्वतःच्या हाताने खाद्यपदार्थ तयार करून केले. याकामात अकोले विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा राजश्री आवारी, सदस्य जयश्री देशमुख, सुरेखा सातपुते तसेच राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस विकास बंगाळ, अभिजित वाकचौरे, अर्जुन खोडके, कुशाबा पोकळे, रावजी मधे आदींचे सहकार्य मिळत आहे.
अकोल्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लोकनेते अशोकराव भांगरे व युवा नेते अमित अशोकराव भांगरे यांच्या सक्रीय योगदानातून परिवर्तन घडले. वैभव पिचड यांच्या पराभवानंतर डॉ. किरण लहामटे आमदार झाले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यात राष्ट्रवादीकडून अनेक विकास कामांना सुरुवात झाली.
लव्हाळवाडीत महिलांना कुटिर उद्योगासाठी विविध वस्तुंचे वाटप
शाखा स्थापनेचे शतक पूर्ण करू
याकामात जि. प. सदस्य सुनीता भांगरे यांनी पायाला भिंगरी बांधली. ग्रामीण भागात जाऊन महिला बचतगट स्थापन करीत आहेत. बचतगटातील महिलांना स्वयंरोजगार तसेच कुटीरोद्योग मार्गदर्शन करताना पहायला मिळत आहे. सुनीता भांगरे यांच्या या संकल्पनेचे पक्ष नेतृत्वाकडून स्वागत होत असून १ जूनपर्यंत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या १०० शाखा स्थापून शतक पूर्ण करण्यात येईल.'' राजश्री आवारी, अध्यक्ष, अकोले विधानसभा महिला आघाडी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.