आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनावरण:कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनची स्थापना, अध्यक्षपदी अ‍ॅड. शिवाजी कराळे; उपाध्यक्षपदी अ‍ॅड. लक्ष्मण कचरे

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशन अहमदनगरची स्थापना करण्यात आली. स्थलांतर होऊन जुन्या जिल्हा न्यायालयात सुरू झालेल्या कौटुंबिक जिल्हा न्यायालयाच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांच्या हस्ते फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

अध्यक्षपदी अ‍ॅड. शिवाजी कराळे, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. लक्ष्मण कचरे, कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. सुरेश लगड व सचिवपदी अ‍ॅड. अनिता दिघे, सहसचिवपदी अ‍ॅड. अर्चना शेलोत, खजिनदारपदी अ‍ॅड. राजेश कावरे, सदस्यपदी अ‍ॅड. अनुराधा येवले, अ‍ॅड. मच्छिंद्र आंबेकर, अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के, अ‍ॅड. शिवाजी सांगळे, अ‍ॅड. सुचिता बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी न्यायाधीश नेत्राजी कंक म्हणाल्या, फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनमुळे कौटुंबिक न्यायदानाच्या प्रक्रियेत मदत होणार आहे. वकील, पक्षकार यांच्या अडचणी सोडवण्यासाठी बार असोसिएशनची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. नूतन अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी कराळे यांनी वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी बार असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असून, सर्व वकील बांधवांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी अहमदनगर शहर वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल सरोदे, उपाध्यक्ष अ‍ॅड. वांढेकर, अ‍ॅड. निर्मला चौधरी, अ‍ॅड. सेलोत, अ‍ॅड. उजागरे, अ‍ॅड. राशीनकर आदींसह पक्षकार उपस्थित होते.