आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना:शहर विकास प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढीसाठी पारनेरात शांतता समितीची स्थापना

पारनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर नगर पंचायत हद्दीतील वाद सामोपचाराने मिटावेत, शहरातील शांतता अबाधित रहावी त्याचबरोबर शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी पारनेर शहर शांतता समितीची स्थापना करण्यात आली आहे.

नगर पंचायतीच्या सभागृहात आमदार नीलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष विजय औटी यांनी शांतता समितीच्या सदस्यांची नावे जाहीर केली.नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या या समितीत विविध क्षेत्रातील २४ सदस्यांचा समावेश आहे. शहरातील सर्व प्रभागांना समितीत प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

शांतता समितीत समाजसेवक डॉ.रफिक सय्यद,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे,दत्ताशेट कुलट,शिक्षक नेते रा.या. औटी,पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे,खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष हसनशेट राजे, शाहीर भास्कर गायकवाड,माजी सरपंच अण्णासाहेब औटी, राजेंद्र तारडे, बाळासाहेब मते, माजी उपसरपंच विजय डोळ, नंदकुमार देशमुख,आनंद औटी, डॉ. सादिक राजे, वकील मंगेश औटी, उमाताई बोरूडे,शिरीष शेटीया, सखाराम औटी, सखाराम बुगे, विनोद गोळे, अमित जाधव, रामदास मते, रामदास औटी यांचा समावेश आहे. बैठकीस राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, माजी उपसरपंच बाळासाहेब नगरे, लेखक मारुती शेरकर,नगरसेवक अशोक चेडे, योगेश मते, नितीन अडसूळ, भूषण शेलार, सुभाष शिंदे, श्रीकांत चौरे,डॉ.सचिन औटी,विजय औटी, नंदकुमार औटी, डॉ. मुदस्सिर सय्यद, अक्षय चेडे, वैभव गायकवाड,रमीज राजे,रायभान औटी, पंकज मते, महेश ठुबे,अनिल औटी आदी उपस्थित होते.

नागरिकांमधील वाद सामंजस्याने मिटवावे पारनेर नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी नगर पंचायत पातळीवर शांतता समितीची स्थापना करून राज्यापुढे आदर्श निर्माण केला आहे.विविध वादांमुळे शहर विकासात निर्माण होणारे अडसर समितीमुळे दूर होऊन विकासाच्या प्रक्रियेला वेग येईल.नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन मिळेल.पारनेर शहर शांतता समिती तालुक्यातील इतर गावांसाठी आदर्शवत ठरेल.प्रत्येक महिन्यात समितीच्या बैठकीचे आयोजन करून नागरिकांमधील वाद सामंजस्याने मिटवावेत. नीलेश लंके, आमदार.

बातम्या आणखी आहेत...