आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Even With Increasing Urbanization, The Air In The City Is Clean; The State of the art Equipment Is Used To Check The Air Quality In The City |marathi News

मोकळा श्वास:वाढत्या शहरीकरणातही नगरची हवा शुद्धच; अत्याधुनिक यंत्राद्वारे होतेय शहरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कधीकाळी भारतातील सर्वाधिक शुद्ध हवेचे ठिकाण समजले जाणारे नगर आजही सर्वाधिक शुद्ध हवेचे शहर म्हणून कायम आहे. नगरमध्ये प्रथमच फ्रान्सहून आलेल्या “अनॅलायझर’या अत्याधुनिक यंत्राद्वारे नगर शहरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली जात आहे. गेल्या चार महिन्यात या यंत्राद्वारे तपासलेल्या शहरातील हवेच्या गुणवत्तेत नगर शुद्ध हवेचे शहर म्हणून आजही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून नगर शहर ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा असलेले व चारही बाजूंनी डोंगर-दऱ्या व मध्य भागात वसलेल्या नगरची हवा ही भारतातील सर्वाधिक शुद्ध असल्यामुळे शुद्ध हवेचे शहर म्हणून एकेकाळी नगरची ओळख होती. पूर्वी दम्याचे रुग्ण शुद्ध हवा घेण्यासाठी नगर शहरात विश्रांतीसाठी यायचे. नगरच्या शुद्ध हवेने अनेक दम्याच्या रुग्णांना बरे केले आहे. विस्तारीकरणामुळे नगर शहरातील वाढलेल्या इमारती, वाढलेली वाहनांची संख्या व वृक्षांची तोड यामुळे नगरची शुद्ध हवा हरवत चालल्याची भीती व्यक्त केली जात होती.

मात्र पूर्वी असलेले शुद्ध हवेचे नगर आजही शुद्ध हवेचे शहर म्हणून कायम आहे. यापूर्वी नगरमध्ये हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली जात नव्हती; आता मात्र प्रथमच नगर शहरातील हवेची गुणवत्ता फान्सहून आलेल्या”अनॅलायझर’ या आधुनिक यंत्राद्वारे तपासली जात असून, गेल्या चार महिन्यात या यंत्राद्वारे तपासलेल्या हवेच्या विविध नमुन्यांमध्ये नगरच्या हवेची गुणवत्ता सर्वोत्तम असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पूर्वी असलेले नगर शुद्ध हवेचे ठिकाण आजही शुद्ध हवेचे ठिकाण म्हणून कायम आहे.

अशी आहे हवेची गुणवत्ता
हवेतील विविध घटकांचे नमुने घेऊन “अनॅलायझर’ यंत्रांद्वारे तपासले जातात. यात शहरातील हवेतील अमोनियाचे प्रमाण ३५ मायक्रो ग्रॅम परमीटर क्यूब आहे. ४०० मायक्रो ग्रॅम परमीटर अमोनियाचे प्रमाण हवेत असल्यास ते धोकादायक असते. हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडचे शहरातील प्रमाण ४ जनुकीय आहे. १०० जनूकीय हे प्रमाण हानिकारक असते. सल्फर डायऑक्साईडचे शहरातील प्रमाण १० परमीटर आहे.१५० परमीटर सल्फर डायऑक्साईड प्रमाण धोकादायक असते. नायट्रोजन ऑक्सिजन (धुळीचे कण) शून्य परमीटर असून, २.५ हे प्रमाण अतिशय धोकादायक मानले जाते. दुर्गंधी होणारे प्रदूषण देखील शहरात कमी आहे.

प्रथमच गुणवत्ता तपासणी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेतील गुणवत्ता तपासण्याचे “अनॅलायझर’ यंत्र शहरातील न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या आवारातील विशेष कक्षात बसवले आहे. फ्रान्स देशातून हे यंत्र मागवण्यात आले आहे. नगर शहरातील हवेच्या गुणवत्तेचे नमुने घेऊन या यंत्राद्वारे तपासली जातात. यापूर्वी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर शहरातच अशा प्रकारचे हवेच्या गुणवत्ता तपासणीचे यंत्र होते. आता नगर मध्ये प्रथमच हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी हे यंत्र आलेले आहे.

कारखान्यांवर राहणार लक्ष
औद्योगिक वसाहतीत तसेच अन्य भागात असलेल्या खासगी कारखान्यांमधून हवेत सोडण्यात येणाऱ्या विषारी वायुची नोंद या यंत्राद्वारे केली जाणार आहे. घातक वायू सोडण्या कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाई करणे आता सोपे जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर न्यू आर्ट महाविद्यालयात या यंत्राद्वारे हवेतील गुणवत्ता तपासली जात आहे. पर्यावरण दिनाच्या (५ जून) या यंत्राचे लोकार्पण होणार आहे. नगर शहरातील हवेतील गुणवत्तेची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर मिळणार आहे. शहरातील नागरिकांनाही डिस्प्ले च्या माध्यमातून दररोजची हवेची गुणवत्ता पाहता येणार आहे.

प्रदूषणाचे प्रमाण अल्प
नगर शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी असलेल्या “एनॅलायझर’यंत्राद्वारे धुळ, दुर्गंधी, तसेच अन्य नमुने तपासले जातात. या यंत्राद्वारे तपासलेल्या नमुन्यांपैकी सर्वच नमुने हे उत्तम असून, नायट्रोजन ऑक्सिजन (धुळीचे कण) शून्य परमीटर आहेत. त्यामुळे सर्वच बाबतीत नगरची हवा अतिशय स्वच्छ व सर्वोत्तम आहे. या यंत्राद्वारे तपासली केलेल्या नमुन्यांची माहिती २ मेपासून डिस्प्ले सुरू करण्यात आला आहे.''
सचिन वाघ, शहर अभियंता, “अनॅलायझर’ यंत्र.

बातम्या आणखी आहेत...