आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त संगमनेर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने व परमपूज्य गगनगिरी विद्यालय पिंपरणे येथे दिव्यांग बालक-पालक मेळावा पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय भास्कर पाटील, गटविकास अधिकारी अनिल नागणे व गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला.
प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख अशोक गोसावी, संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख व गगनगिरी विद्यालयाचे प्राचार्य मुकुंद डांगे, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक संजय बोरसे उपस्थित होते. पिंपरणे केंद्रातील ३० विद्यार्थी व पालक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती शैक्षणिक व सामाजिक प्रगती याबाबत विशेषतज्ञ समावेशित महेश काळे यांनी मार्गदर्शन केले. मुलाचे दिव्यांग प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराबाबत विशेष शिक्षक मनोज आहेर यांनी माहिती दिली.
गटशिक्षणाधिकारी म्हणाल्या, प्रत्येक दिव्यांग मुल शाळेत दाखल करणे व त्याचा शैक्षणिक विकास करणे यासाठी शासन प्रयत्नशील असून पालकांनी योग्य प्रतिसाद दिल्यास दिव्यांग मुलाचे सबलीकरण शक्य होईल. तांत्रिक सहाय्य अंभोरे येथील तंत्रस्नेही शिक्षक सचिन रनाते यांनी दिले. मेळाव्याच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक संजय बोरसे, सहशिक्षक विक्रम घाणे, कविता ढोमसे हे प्रयत्नशील होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.