आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामुदायिक विवाह सोहळा:राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आमदार लंके यांचा आदर्श घ्यावा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रतिपादन

पारनेर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संकटकाळात जनतेसोबत राहणारा आमदार अशी नीलेश लंके यांची ओळख केवळ राज्यात नव्हे तर देशात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक युवकाने आमदार लंके यांचा आदर्श ठेवावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

आमदार लंके यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील हंगे येथे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. वधू-वरांना आशीर्वाद देताना पवार बोलत होते. विवाह सोहळ्यापूर्वी हंगे येथील सुमारे १९ कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. आमदार लंके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, माजी आमदार दादा कळमकर,जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके,आत्मा समितीचे अध्यक्ष राहुल झावरे,तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, रा. या. औटी, शिवप्रहारचे अध्यक्ष संजीव भोर, ज्ञानदेव लंके,पूनम मुंगसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पवार म्हणाले, कोरोना संसर्गाच्या काळात संपूर्ण देश हादरला होता. हतबल झाला होता. अनेक महिने लोक घराबाहेर पडू शकले नाहीत. मात्र या भीषण परिस्थितीत आमदार लंके यांनी जनतेची साथ सोडली नाही. स्वत:चे वेतन आणि लोकांनी दिलेल्या देणग्यांमधून कोविड उपचार केंद्र सुरू केले.या उपचार केंद्रातून हजारो रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. कोरोना संसर्ग काळात आमदार लंके यांनी जनतेला धीर देण्याचे,आधार देण्याचे काम केले. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे पवार म्हणाले.

पवार म्हणाले, कोरोना संसर्गाच्या काळात संपूर्ण देश हादरला होता. हतबल झाला होता. अनेक महिने लोक घराबाहेर पडू शकले नाहीत. मात्र या भीषण परिस्थितीत आमदार लंके यांनी जनतेची साथ सोडली नाही. स्वत:चे वेतन आणि लोकांनी दिलेल्या देणग्यांमधून कोविड उपचार केंद्र सुरू केले.या उपचार केंद्रातून हजारो रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. कोरोना संसर्ग काळात आमदार लंके यांनी जनतेला धीर देण्याचे,आधार देण्याचे काम केले. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे पवार म्हणाले.

आमदार लंके म्हणाले, कोरोना संसर्ग नुकताच आटोक्यात येऊ लागला आहे.मात्र गेले दोन वर्षे अत्यंत बिकट परिस्थिती होती.अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे पटत नव्हते.मात्र कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने समाजपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची सूचना आपण कार्यकर्त्यांना केली.त्यातून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याची कल्पना पुढे आली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्यांच्या घरातील अनेक उपवर मुला मुलींचे विवाह रखडले होते.अशा कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.सामुदायीक विवाह सोहळ्याबरोबरच, मतदार संघातील अनेक गावांत कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले.या निमित्ताने ५०० कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचाराचा खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे ८०० गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.

आमदार लंके यांना मंत्रिपदाची संधी द्यावी अशी विनंती माजी आमदार कळमकर यांनी शरद पवार यांना यावेळी केली.

संकट काळात जनतेसोबत राहणारा आमदार अशी लंके यांची ओळख

लंके यांच्यामुळे आमची अडचण
आमदार लंके यांच्यामुळे आमची मोठी अडचण झाली आहे.सामाजिक कामांमुळे ते राज्यभर पोहचले आहेत. कार्यक्रमानिमित्त राज्यात कुठेही गेलो की लोक आमदार लंके यांची चौकशी करतात. पुढच्यावेळी त्यांना घेऊन या, आमदार लंकेे यांच्यासारखा आमदार आम्हाला द्या, अशी मागणीही करतात, असे पवार म्हणाले.

३६ जोडपी विवाहबद्ध
विवाह मंडपाच्या प्रवेशद्वारापासून व्यासपीठापर्यंत शरद पवार यांना विशेष वाहनातून आणण्यात आले. या वाहनाचे सारथ्य आमदार लंके यांनी केले.पवार यांचा चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला.विवाह सोहळ्यात ३६ जोडपी विवाहबद्ध झाली. यापैकी १५ जोडपी दिव्यांग होती. आमदार लंके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी कन्यादान केले.

बातम्या आणखी आहेत...