आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:कोल्हे यांची विज्ञानदृष्टी सर्वांना भावते, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची शंकरराव कोल्हे यांना श्रद्धांजली

कोपरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शंकरराव कोल्हे आणि आमचे वडील अंकुशराव टोपे जीवलग मित्र होते, त्यामुळे त्यांचे व माझ्या वयात कितीही अंतर असले तरी त्यांची सामाजिक प्रश्नावर असलेल्या तळमळशील आम्ही बांधलो गेलो असुन, त्यांची विज्ञानहष्टी सर्वांना भावते, प्रत्येक कामाच्या प्रती असलेली त्यांची निष्ठा पुढच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केले. येसगाव कोल्हे वस्ती येथे सांत्वन भेटीप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी आले होते. त्यांनी शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नितीनदादा कोल्हे, डॉ. मिलींदराव कोल्हे, बीपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूटचे कार्यकारी विश्वस्थ अमित कोल्हे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे, निलीमाताई पवार आदी उपस्थीत होते. डॉ. टोपे म्हणाले, शंकरराव कोल्हे हे एक लढवय्ये नेतृत्व होते. आजारपणात शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. परदेशात शिक्षण घेऊनही त्यांनी येथील काळ्या मातीची देहबोली कधीही सोडली नाही. त्यांचा राज्यभर मित्रत्वाचा परिवार आहे. सगळ्या आजाराशी त्यांनी झुंज दिली. त्यांचा विकासवादी दृष्टीकोन पुढील पिढीने सुरू ठेवावा हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे ते म्हणाले. दरम्यान, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे सांत्वन करण्यासाठी राज्यभरातील नेते कोपरगावात येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...