आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:मूलभूत जबाबदारी म्हणून प्रत्येकाने पर्यावरण अन् वृक्ष संवर्धन करावे

संगमनेर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लोबल वार्मिंगच्या समस्येमुळे दुष्काळासह अनेक नैसर्गिक संकटे येत आहेत. जगात सध्या तापमान वाढते आहे. हे सजीव सृष्टीसाठी धोकादायक आहे. वाढलेले तापमान रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन महत्त्वाचे आहे. पुढील काळात प्रत्येकाने मूलभूत जबाबदारी म्हणून पर्यावरण व वृक्ष संवर्धन करावे, असे आवाहन युवानेते राजवर्धन थोरात यांनी केले.

तालुक्यातील कोळवाडे येथील मोरया डोंगर परिसरात एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या वतीने दंडकारण्य अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी थोरात बोलत होते. फादर रॉबर्ट डिकोष्टा, पंचायत समिती सदस्य कालशिनाथ गोंदे, भाऊसाहेब नवले, श्रीराम कुऱ्हे, जयहिंद आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दशरथ वर्पे, प्रा. बाबा खरात, बाळासाहेब उंबरकर, मंगेश वर्पे, सोपान वर्पे, पंकज जाधव आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

थोरात म्हणाले, वाढत्या तापमानामुळे युरोपमध्ये अनेक जंगलांना आग लागत आहे. जंगले नष्ट होत आहेत. वृक्ष व वनराई ही सजीव सृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वाढत्या तापमानाने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी परिस्थिती ओळखून प्रत्येकाने वृक्ष संवर्धन केलेच पाहिजे. तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. विद्यार्थ्यांमध्ये देखील वृक्षांबाबद प्रेम व जाणीव जागृती निर्माण झाली आहे. हे आनंददायी आहे.

फादर डिकोस्टा म्हणाले, वृक्षारोपणाबरोबर वृक्ष संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनचा तुटवडा सर्वांनी अनुभवला आहे. ऑक्सिजन पुरवणारा वृक्ष मोठी कंपनी आहे. ती जपली पाहिजे. अन्यथा भविष्यकाळ सर्वांसाठी अत्यंत दुःखदायक असेल, असे ते म्हणाले. प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीराम कुऱ्हे यांनी तर बाळासाहेब उंबरकर यांनी आभार मानले.

राजवर्धन यांनी साधला विद्यार्थ्यांसमवेत संवाद
राजवर्धन थोरात यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत मोरया डोंगरावर जाऊन वृक्षारोपण केले. तालुक्यातील शाळेंमधील विद्यार्थी संगमनेर तालुक्यातील खरे वृक्षदूत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी अमेरिकेतील शिक्षण पद्धती, तेथील वातावरण अगदी सहज सोप्या भाषेत सांगत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कोळवाडे येथे वृक्षारोपण प्रसंगी युवानेते राजवर्धन थोरात समवेत फादर रॉबर्ट डिकोस्टा, श्रीराम कुऱ्हे, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, बाळासाहेब उंबरकर, मंगेश वर्पे व पदाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...