आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोग:प्रत्येकाने कर्करोगमुक्त भारत असा‎ संकल्प करायला हवा : जगताप‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण कितीही चांगली जीवन शैली जगत असलो तरी‎ कर्करोग हा छुपा आजार आहे. आज कर्करोग‎ दिनानिमित्त आपण कर्करोगमुक्त भारत असा संकल्प‎ केला पाहिजे, असे आवाहन अामदार संग्राम जगताप‎ यांनी केले.‎ जिल्हा रूग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त‎ गरूड कॅन्सर हॉस्पिटल ॲण्ड रेडिएशन सेंटरतर्फे‎ कर्करोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या‎ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत‎ होते. अध्यक्षस्थानी डॉ.दर्शना धोंडे होत्या. बाळासाहेब‎ खेडकर उपस्थित होते. कर्करोग तज्ञ डॉ. प्रकाश गरूड‎ म्हणाले, कर्करोग हा प्राणघातक आजार असला तरी‎ लवकर निदान व उपचार मिळाल्यास तो पूर्ण बरा होवू‎ शकतो. कर्करोग शरीरात चोर पावलांनी प्रवेश करतो.‎ जेव्हा तो वाढतो तेव्हाच लक्षणे दिसतात. प्रत्येकाने‎ आरोग्याबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे.‎

बातम्या आणखी आहेत...