आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडेंचा फडणवीसांना जोरदार टोला:त्यांनी आमदारांना सुरत, गुवाहटी, गोवा फिरवून एवढा प्रपंच केला पण मुख्यमंत्रीपदापासून वंचित

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकार तुम्ही पाडले, पण पाडूनही तुम्हाला मुख्यमंत्री होता येत नाही किती वाईट परिस्थिती आहे. दुसऱ्याची जिरवण्यासाठी स्वतःची जिरली, तरी चालेल असा प्रकार म्हणजे आत्ताचे सरकार असा टोला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज भाजपला लगावला.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे जल जीवन मिशनच्या 40 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन काही दिवसापूर्वी भाजपने केले होते. याच योजनेचे दुसरे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री होता आले नाही

मुंडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पडले पण पाडूनही त्यांना मुख्यमंत्री होता येत नाही किती वाईट परिस्थिती आहे. ज्यांनी माणसं फोडले सुरत होऊन गुवाहाटी, गोवा आणि पुन्हा मुंबईत आणली तरी भाजपला मुख्यमंत्री पदावर बसता आले नाही. दुसऱ्याची तरी जिरवण्यासाठी स्वतःची जिरली तरी चालेल तो प्रकार म्हणजे आत्ताच सरकार आहे.

खासदार विखेंना टोला

मुंडे म्हणाले, खासदारांची ऐपत मोठी आहे. आता महसूल मंत्रीपद मिळाले. हे पद चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांना मिळाले नाही. एवढे जर तुमचे संबंध आहेत, तर या चाळीस कोटीच्या पाणी योजनेचे श्रेय घेऊ नका एखादा हजार ते दोन हजार कोटींचा प्रकल्प आणून मग श्रेय घ्या, असा सल्ला धनंजय मुंडे यांनी खासदार सुजय विखे यांना दिला.

कसं करायचं ते पाहू...

यापूर्वी वांबोरीत जे चालायचे ते आता चालणार नाही. आता ऐकायला कटू वाटत असले तरी ते ऐकावं लागेल, ज्यांना सहन होत नसेल तर त्यांना कस नीट करायचं ते आम्हाला माहित आहे, असा टोला आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्थानिक विरोधकांचे नाव न घेता लगावला.

धनंजय मुंडेंचा सत्कार करताना पदाधिकारी.
धनंजय मुंडेंचा सत्कार करताना पदाधिकारी.

मुलाला हे धंदे शिकवले का? - भिटे

वडीलांना त्यांची मुलं धंदा करायला सांगत नाहीत. पण वडील मुलाला धंदा शिकवतात. मग यांनी त्यांच्या मुलांना गावातील जमिनी विकायच्या ? डेअरीच्या जमिनी विकायच्या ? डेअरीच्या जमिनी विकून लोकांना फसवायचे हे धंदे शिकवले का ? असा सवाल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी विरोधकांना केला. पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी देखील यांनी परत न केल्याने अनेकांचे विवाह थांबले, अशीही टीका त्यांनी केली.

यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार प्राजक तनपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सुरेश बाफना, माजी सरपंच नितीन बाफना किसन जवरे, कृष्णा पटारे, उद्योजक संतोष कांबळे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, एकनाथ ढवळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...